दिनांक ६ मे

इंदापुर : भरतशेठ शहा यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात इंदापूर शहरात प्रचंड आघाडी घेतल्याने तरुण मतदारांमध्ये त्यांच्या या भूमिकेचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतच्या होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत शहा कुटुंबियांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी च्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

तर विरोधी महायुती च्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांनी पद्धतशीरपणे मतदारांची भक्कम मोठ बांधल्याने त्यांच्या एकगट्टा मताचे विभाजन प्रत्यक्ष उद्या होणाऱ्या मतदानानंतरच दिसून येणार आहे.

मागील काही दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व इंदापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केल्याने सुरुवातीला तालुक्यातील एकतर्फी दिसणाऱ्या निवडणुकीत रंगत आली व मतदारांमध्ये नवचैतन्य आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणाऱ्या मतदानामध्ये भरघोस वाढ होणार यावर शिक्कामोर्तब झाले.

संपूर्ण प्रचाराच्या काळात जरी प्रत्यक्ष प्रचारात सहभागी न होणारे अनेक मातब्बर आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांना म्हणजेच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना मदत करतील अशी चर्चा आहे. त्यातच 

काल (दि.५) रोजी झालेल्या निवडणूक प्रचार सांगता सभेत शरद पवार व उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब जगदाळे यांनी मतदारांना भावनिक आवाहन करताना जर कोणाला काही अडचण आली तर अप्पासाहेब जगदाळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आवाहन केल्याने मतदार राजा सुखावला असल्याचे चित्र आहे.

आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. याचा परिणाम उद्या(दि.७) होणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *