दिनांक २४ मे

इंदापुर ( दि २४) : येथील तहसील कचेरीच्या हाकेच्या अंतरावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांची सरकारी गाडी जात असताना अज्ञाताने लोखंडी रोड व मिरची पूड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये श्रीकांत पाटील थोडक्यात बचावले परंतु गाडीच्या काचा फोडून चालकाच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर माहिती अशी की आज ( दि२४) सकाळी ११ च्या दरम्यान तहसील कचेरीत आपल्या सरकारी सुमो गाडीतून जात असताना संविधान चौक येथे अज्ञात जमावाने गाडी अडवून लोखंडी रॉडसह गाडीवर जोरदार हल्ला केला व तहसीलदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चालक यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला परंतु यातून तहसीलदार यांच्यासह चालक थोडक्यात बचावले.

ही घटना पाहून आजूबाजूचे लोक धावून आल्याने तहसीलदार व चालक थोडक्यात बचावले यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *