दि.१५ नोव्हेंबर

इंदापूर : माजी नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे खंदे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांची शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच आमदार दत्तात्रय भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, शुभम निंबाळकर यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्या सहिचे पत्र त्यांना मान्यवराच्या उपस्थिती देण्यात आले.

दादासाहेब सोनवणे हे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे विश्वासू व खंदे समर्थक आहेत यापूर्वी त्यांनी इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून शहरात त्यांचा सर्वांशी स्नेहबंध आहे

त्यांनी आजपर्यंत आरोग्य शिबिरे, महापुरुषाची जयंती उत्सव या माध्यमातून समाजसेवा केले आहे. पक्षाशी एकनिष्ठ म्हणून त्यांची शहरामध्ये ओळख आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या खास मर्जीतील म्हणून ही त्यांची सर्वत्र ओळख आहे त्यांच्या निवडीचे स्वागत शहरात सर्वत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *