दि.१६ नोव्हेंबर

इंदापूर : कौठळी गावचे सुपुत्र आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत हामा पाटील यांची निवड पुणे जिल्हा सोशल मीडिया च्या उपाध्यक्षपदी करण्यात आली.

हमा पाटील हे पूर्वी सोशल मीडिया इंदापूर तालुका प्रमुख पदी कार्यरत होते.पक्षावरील निष्ठा व सर्वसामान्यांची कामे करण्याचा त्यांचा हातखंडा, कधीही कोणत्याही क्षणी उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची संबंध तालुका भर असणारी ख्याती या त्यांच्या जमेच्या बाजू बघून पक्षश्रेष्ठींनी व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांची पुणे जिल्हा सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी निवड केली.

हमा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी युवकाचे संघटन अतिशय मजबूत पद्धतीने तालुक्यात उभारले आहे. पक्षाची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणीचे काम त्यांनी आज तागायत गेली आठ वर्ष सातत्याने केले आहे. पक्षासाठी अनुकूल असे वातावरण कसे तयार होईल यासाठी त्यांची सतत धडपड असते. त्यांच्या या बाजूची दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन त्यांना सोशल मीडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत इंदापूर तालुक्याबरोबरच पुणे जिल्ह्यात होत आहे.

निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,आमदार दत्तात्रय भरणे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *