
इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य संजयकुमार शिंगारे व पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. शालेय अभ्यासक्रमातील नफा -तोटा,खरेदी विक्री कौशल्य ,गणिती क्रिया,देवाण घेवाण, प्रत्यक्ष अनुभवातून शिकता याव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो.या मेळाव्यामध्ये जवळपास विविध प्रकारचे 80 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले. विविध प्रकारचा खाऊ विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने बनवून विक्रीसाठी आणला.तसेच काही पदार्थ मागणीनुसार बनवून दिले. भाजीपाला,फळभाज्या, विविध फळे, स्टेशनरी, संक्राती साठी लागणारे वाण इत्यादी प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. आठवडे बाजारात जवळपास २५ ते ३० हजार रकमेची उलाढाल झाली. अनेकांनी खाऊ गल्लीचा मनमुराद आस्वाद घेतला.शिक्षकांनीही मुलांच्या आनंदात सहभागी होऊन आठवडे बाजारची मजा लुटली.आजूबाजूचे अनेक पालक खरेदीसाठी आले.त्यामुळे मोठ्या उत्साहात बाल आनंद मेळावा साजरा झाला.
