दिनांक १ फेब्रुवारी

 

राजवर्धन (दादा) हर्षवर्धन पाटील यांना स्वराज्य न्युज तर्फे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…

(प्रकाश आरडे)…..

 

इंदापूर : गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचां जीवन पट पाहिल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवते की या सर्वांनी समाजकारण, राजकारण करीत असताना स्वकर्तृत्व सिद्ध केले आहे. एक वैचारिक सिद्धांतांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात ते आजरामर झालेले आहेत.

आज राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस… घरात राजकीय पार्श्वभूमी खंबीर असून देखील स्वतःचे वेगळेपण जपणारा सुसंस्कृत युवक अशी ओळख निर्माण करणारा युवक म्हणून राजवर्धन दादा यांच्याकडे पाहिले जाते.आजोबा शंकरराव पाटील वडील हर्षवर्धन पाटील हे राज्याच्या राजकारणात वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

राजकारणी घरात जन्म घेऊन स्वकर्तुत्वावर ओळख निर्माण करणे हे सहज शक्य सोपी गोष्ट नाही. राजवर्धन दादांना कोणताही गर्व नाही मी श्रीमंत घराण्यातील असल्याचा. ते अनेक सहकारी संस्थांवर कार्यरत असताना आपण एखाद्याचे काम त्या पदावर असताना सहज करू शकतो हा पायंडा त्यांच्यामध्ये दिसून येतो. नेहमीच तरुण व ज्येष्ठांच्या गर्दीत राहून सुद्धा आपणाकडे आलेल्या प्रत्येकाचे काम मार्गी लागलीच पाहिजे हे त्यांची कामाची पद्धत आहे. त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम झाल्यानंतर सुद्धा त्या माणसाची आपलेपणाने चौकशी करणे हीच धारणा कायम त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे एकदा माणूस त्यांच्याकडे कामाच्या निमित्ताने गेला की कधी तो त्यांच्याशी एकरूप होऊन जातो हे त्या माणसाला देखील कळत नाही.

तालुक्यातील कोणताही प्रसंग सुखाचा असो वा दुःखाचा त्याठिकाणी राजवर्धन दादा आवर्जून उपस्थित असतात. फारशा प्रसिद्धीच्या भानगडीत न पडता थेट त्या कुटुंबाच्या घरी जाऊन भेट देणारा माणूस म्हणून ते अल्पावधीतच चर्चेचा विषय बनले आहेत .कार्यकर्त्याचा भला मोठा फौज फाटा घेऊन मिरवणे त्यांना पसंत नाही. रस्त्यात एखादा अपघात झालेला असो की शाळकरी विद्यार्थी थांबलेले असो किंवा ज्येष्ठांची गर्दी असो, दादांची गाडी थांबलीच म्हणून समजा. शहरात फेरफटका मारून चहाच्या गाडीवर चहा पीत पीत गप्पा मारणे असो याच साधेपणाने व थेट जनतेत मिसळल्यामुळे दादा कमालीचे तरुणांबरोबरच ज्येष्ठांमध्ये देखील आपल्या हक्काचा माणूस म्हणून नावारूपाला आले.

सबंध तालुका भर असे गाव नाही दादा त्या गावात पोहोचले नाहीत. आपला वाढदिवस साधेपणाने करणे हा त्यांचा पायंडा. साधी राहणी उच्च विचारसरणी आशा तत्त्वाने त्यांचे वागणे असते. स्वतःचा वाढदिवस कधी ते ऊसतोड मजुरांसोबत साजरा करतात तर कधी हितचिंतकांच्या शुभेच्छाचा स्वीकार करीत असताना मला हार फेटा नको तुम्हीच बांधा हा आग्रह असतो.

अंगावर कधी खादी नाही, सलवार नाही अगदी साधा शर्ट पॅन्ट घालून सतत समाजातील तरुण व ज्येष्ठमध्ये रममान होणारा युवक आपल्या स्वतःच्या कर्तुत्वामुळे अल्पावधीतच तालुक्याचे उद्याचे भविष्य म्हणून नावावर रूपाला आले आहेत. समाजात वैचारिक सिद्धांत घेऊन काम करणाऱ्याला समाज नेहमी डोक्यावर घेतो, तोच समाजाचा आधारस्तंभ होतो हाच गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहास आहे.दादांच्या बाबतीत हाच साधेपणाचा वैचारिक सिद्धांत त्यांना भविष्यात इंदापूर तालुक्याचा आधारस्तंभ म्हणून नावारूपाला आणणार हे निश्चितच.

पुन्हा एकदा स्वराज्य न्युज तर्फे राजवर्धन दादांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *