दि.१५ फेब्रुवारी

इंदापूर : तालुक्याचे राजकारण दिवसेंदिवस मनोरंजक होताना दिसुन येत आहे.. तालुक्यातील कसलेही कार्यक्रमाला आजी-माजी आमदार उपस्थित असले की एकमेकावर हमखास टीकाटिप्पणी होत असते, साहजिकच उपस्थित नागरिकांचे भलतेच मनोरंजन होत आहे. एक मात्र आहे राज्याच्या सत्तेत असल्याने एकमेकांच्या पक्ष्याविषयी अजिबात चकार शब्द देखील काढत नाहीत.
अशातच तालुक्यात कोणताही गाजावाजा न करता आम आदमी पार्टीची मोर्चे बांधणी शांत पद्धतीने गावोगावी युवक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासह बैठकांचा सपाटा जोरात चालू आहे त्यामुळे हाच पक्ष येत्या लोकसभेला व विधानसभेला निर्णयाक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते त्यांच्या विश्वासू सहकार्यांना सोबत घेऊन संबंध तालुका भर पक्षाविषयी व पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी पटवून सांगत आहेत. दिल्ली व पंजाब या ठिकाणी पार्टीची सत्ता असल्याने तेथील झालेला विकास राबवलेली धोरणे याविषयी ते ठासून सांगत आहेत.
पक्षात जातीयवाद किंवा धर्मवादाला थारा दिला जात नाही असेही ठामपणे सांगून येणाऱ्या काळात जनसामान्याचे मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज एसटी बस प्रवास, रस्ते, पंजाब सरकारच्या धर्तीवर स्वस्त धान्य दुकानात मिळणारा माल घरपोच मिळण्यासाठी पक्षाचे धोरण असल्याचे ते सांगत आहेत.
स्वराज्य नयुज शी बोलताना आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते म्हणाले की तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष लोकांची मते जाणून घेतले असता प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून आम्ही पक्षाच्या वतीने सद्यस्थितीत सत्तेवर असणाऱ्या तीन इंजिन सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळी सह जाहीर सभेचे आयोजन थोड्या दिवसात करण्यात येणार आहे.
