दिनांक १८ मार्च 

इंदापूर : लोकसभा २०२४ चे पडघम महाराष्ट्रभर घुमु लागले आहेत . जो तो पदाधिकारी आपापल्या उमेदवाराचा प्रचार मनापासून करीत आहे तर काही पदाधिकारी आपण प्रचार करीत असल्याचे दाखवीत आहेत,परंतु इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर व इंदापूर शहराध्यक्ष रेश्मा शेख या दोन महिला पदाधिकारी रात्रंदिवस आपला उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार हिरीरीने घरोघरी जाऊन करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत तालुका भर प्रत्येक गावात पक्षाचे नवीन चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस घरोघरी पोहचविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक पक्षातील वरिष्ठांबरोबरच इतर देखील करीत आहेत.

          पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाची व जिद्दीची प्रेरणा घेऊन संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विजयासाठी जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर व इंदापूर शहराध्यक्ष रेश्मा शेख या रात्रंदिवस एकच ध्यास सुप्रियाताई सुळे होणार खासदार या जिद्दीने प्रचाराच्या कामाला जोरदारपणे लागले आहेत. पक्षाला मिळालेले नवीन चिन्ह घरोघरी पोहचवून संपूर्ण तालुक्याचा दौरा करणाऱ्या एकमेव या दोन महिला आहेत. त्यामुळे मतदारांबरोबरच पक्षातील पदाधिकारी देखील त्यांच्या या कामावर समाधानी असल्याचे चित्र आहे. तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर म्हणाले की पक्षाने व आमच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे व जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे यांनी आमच्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रियाताई सुळे निवडून येण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. या प्रयत्नाला हमखास यश मिळून व सुप्रियाताईंच्या कामाच्या जोरावर निश्चितपणे त्या निवडून येणार आहेत असे ठासून सांगितले. इंदापूर शहराध्यक्ष रेश्मा शेख म्हणाल्या की संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे महिला विषयी असणारे काम तसेच समाजातील विविध घटकांसाठी करीत असलेल्या कामाची पोहच पावती मतदार शंभर टक्के देऊन मतदान घडवून आणतील असा मला ठाम विश्वास आहे. आम्ही तालुका भर प्रत्येक गावात घरोघरी जाऊन पक्षाचे चिन्ह पोहचविण्याचे काम केले असता व प्रत्यक्ष महिला, जेष्ठ व तरुणांना भेटून पक्षाची भूमिका व आमच्या उमेदवार सुप्रियाताई यांना मतदान करण्याचे आवाहन केले असता आम्ही शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्याच विचाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्यांनाच मतदान करणार असे ठासून सांगत आहेत म्हणूनच आम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास आहे की आमचा उमेदवार निश्चित बारामती लोकसभेला जिंकणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या इंदापूर तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर व शहराध्यक्षा रेश्मा शेख या दोन महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचारात आघाडी घेतली ची दिसत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *