दि. १५ नोव्हेंबर

इंदापूर : इंदापूर हे फार प्राचीन शहर आहे. मालोजीराजांचा गौरवशाली इतिहासाचा वारसा या शहराला आहे. आजही इंदापूर शहरांमध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत ते ठिकाणी इतिहासाचे साक्षीदार आहेत.
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया च्या इतिहास विभागाच्या वतीने दरवर्षी हेरिटेज वाॅक चे आयोजन करीत असते. याही वर्षी काल दिनांक १४ नोव्हेंबर रोजी ” हेरिटेज वॉक सन २०२२ ” चे आयोजन इतिहास विभागाच्या वतीने केले असल्याचे इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक विद्या गायकवाड यांनी सांगितले.

या हेरिटेज वॉक मध्ये इतिहास विभागातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. मालोजीराजांचा गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या इंदापूर येथील स्थानिक इतिहासाचा अभ्यास या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केला. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या स्थळांचा अभ्यास केला.
हेरिटेज वॉक चे आयोजन इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक विद्या गायकवाड, डॉ. प्राध्यापक बाळासाहेब काळे ,प्राध्यापक दीक्षा बोंगाणे, प्राध्यापक विशाल चव्हाण यांनी केले होते. विद्यार्थ्यांना इंदापूर शहराचा स्थानिक इतिहास प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजावून सांगितला.

इंदापूर शहराचा व मालोजीराजांचा गौरवशाली इतिहास दर्शवणारे ठिकाणे पुढील प्रमाणे.
१) दत्त मंदिर २) विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३) देशपांडे वाडा ४) सिद्धेश्वर मंदिर ५) इंद्रेश्वर मंदिर ६) जुनी कचेरी (मालोजीराजे भोसले यांची गडी) ७) चांद शहावली दर्गा ८) पठाण विहीर ९) भार्गव राम तलाव (तळ्याची पाळी)
वरील ठिकाणांना गौरवशाली इतिहास आहे तो इतिहास पुढील भागात सांगत आहोत.
