दि.१७ नोव्हेंबर

इंदापूर : (दि १७) धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी बारामती येथे चंद्रकांत वाघमोडे यांचे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाला क्रांतीज्योती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे व तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपोषण स्थळी जाऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी, विभाग बारामती, देवेंद्र बनकर जिल्हा उपप्रमुख शिवसेना (शिंदे गट), प्रकाश पवार तानाजी भोंग, पंकज राऊत इत्यादी उपस्थित होते.
सध्या राज्यभर मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी अतिशय जोमाने सुरू असलेले आंदोलन चालू असतानाच धनगर समाजाचा देखील एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी राज्यभर धनगर समाजाच्या वतीने उपोषण व आंदोलन सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर बारामती येथे चंद्रकांत वाघमोडे यांचे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना वरचेवर पाठिंबा मिळत आहे. आज (दि१७) रोजी क्रांतीज्योती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे आपल्या ओबीसी सहकारी बांधवांसह बारामती येथे उपोषण स्थळी जाऊन सुरू असलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला व भविष्यात इंदापूर येथे तालुकास्तरीय ओबीसींचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी अनेक ओबीसी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.
