दि.१७ नोव्हेंबर

इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव येथील सरडे परिवारातील युवक नेतृत्व ओंकार सरडे यांची नुकतीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली . यावेळी आमदार दत्तात्रय भरणे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,सचिन सपकाळ, शुभम निंबाळकर, सचिन खामगळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सहीचे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, आचार – विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल असा मला विश्वास आहे.
ओंकार सरडे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर बढती मिळाली आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या इंदापूर शहराध्यक्षपदी कार्यरत होते. त्यांनी या पदावर असताना युवकांचे संघटन उत्तम प्रकारे केल्याने व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आघाडी घेतल्याने त्यांना तालुकाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर बढती देऊन काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
ओंकार सरडे यांचे वडील शरद सरडे व चुलते दत्तात्रय सरडे व एकूणचं सरडे परिवाराने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने ठामपणे असल्याने व सरडे परिवाराची पक्षाशी असणाऱ्या एकनिष्ठतेमुळे परिवारातील उदयन्मुख युवक ओंकार यास पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देऊन या परिवाराचा गौरव करण्यात आला आहे.
स्वराज्य न्युज शी बोलताना ओंकार सरडे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष प्रदीप (दादा) गारटकर, आमदार दत्तात्रय भरणे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी माजी नियुक्ती केली व माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल या सर्वांचे व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मी मनापासून आभार मानतो. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोचवून पक्ष संघटना बळकट करण्यास मी प्राधान्य देईन अशी ग्वाही दिली.
ओंकार सरडे यांच्या निवडीबद्दल युवक वर्गामध्ये नवचैतन्य व आनंदी वातावरण आहे. तालुकाभर त्यांचे अभिनंदन होत आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. भविष्यात त्यांना युवक तालुका अध्यक्ष पद मिळो या सदिच्छांचा वर्ष सोशल मीडियावर होत आहे.
