दिनांक २० नोव्हेंबर

इंदापूर : (दि २०) राज्यभर मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनाने पेट घेतलेला असतानाच व मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात जनजागृतीसाठी राज्यभर मराठा समाज जनजागृतीसाठी सभांचा धडाका चालू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आरक्षणावरून शाब्दिक चकमक चालू आहे दोन्ही नेते आक्रमक आहेत.

आज (दी २०) रोजी तालुक्यातील ओबीसी समाजातील प्रमुख यांचे इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात माजी नगराध्यक्ष तथा क्रांतीज्योती विचार मंचचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पांडुरंग तात्या शिंदे व अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक समाजाला ओबीसी प्रवर्गातूनअसणारे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी ओबीसींचा भव्य महामेळावा आयोजित करून विद्यमान अन्न नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात भव्य असे महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हा महामेळावा महाराष्ट्र भर ओबीसींना दिशा देणारा व मराठा समाजाला कुणबी दाखल्याचा आधार घेऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून ओबीसी प्रवर्गातील समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारा महामेळावा असेल असे अनेक मान्यवरांनी जाहीर केले.

यावेळी युवराज (अण्णा) मस्के, माजी नगरसेवक अनिल राऊत, राष्ट्रसेवा दलाचे रमेश (आबा) शिंदे, सरपंच तुकाराम करे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी एडवोकेट नितीन राजगुरू, उद्योजक अतुल व्यवहारे, माळी महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ देवकर, माळी महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, बाबजी भोंग , माजी नगरसेवक पोपट शिंदे, मौर्य क्रांती संघटनेचे इंदापूर शहराध्यक्ष प्रकाश पवार, सागर व्यवहारे, सागर रायकर, गोविंद बोराटे, वैभव जाधव व अनेक  प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *