जिल्हाधिकाऱ्यांची आजच टेंडर काढणार असल्याची माहिती

 

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडली. यावेळी मा. राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर शहरातील ऐतिहासिक वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धन व जतन च्या आराखड्यास तांत्रिक मान्यता देण्याची विनंती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली. यावेळी मा. अजितदादा पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारी यांना तांत्रिक मान्यता देऊन निविदा करण्यासंदर्भाच्या सूचना केल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी आजच निविदा तयार करणार असल्याची माहिती पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांना दिली. तसेच यावेळी आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील शाळांमधील वर्ग खोल्याच्या दुरवस्था बाबत मा. पालकमंत्री अजितदादा पवार यांच लक्ष वेधून वर्ग खोल्या दुरुस्ती करण्यासाठी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *