
इंदापूर : छायाताई पडसळकर यांचा आज जन्मदिवस प्रथमत: छायाताई यांना स्वराज्य न्युज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
छायाताई यांच्या आजपर्यंतच्या जीवनावर प्रकाश टाकताना शब्दही अपुरे पडावेत असा हा त्यांचा थक्क करणारा जीवन प्रवास. राजकारण व समाजकारणात डोक्यावर हात असल्याशिवाय कोणीही यशस्वी होत नाही परंतु याला अपवाद फक्त छायाताई आहेत. या रणरागिनीची जिद्द आणि चिकाटी पाहिल्यानंतर त्यांच्याविषयी काय लिहावे किंवा काय बोलावे हा माझ्यासारख्याच्या समोर प्रश्नच उभा राहतो.
नुकतेच कोरोना काळामध्ये जीवनसाथी पतीचे निधन झाले. अशा अवस्थेत महिला महिनोन महिने वर्षानुवर्षे खचून जातात हे आपण पाहतच असतो. परंतु छायाताई मुलांच्या भविष्यासाठी मोठ्या हिमतीने उभा राहिल्या. त्या उभा राहिला नाही तर त्यांनी अनेक कुटुंबांना मायेचा हात दिला व अनेक प्रपंच जोडण्याचे काम केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना त्या महिला तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर सुद्धा केवळ सुप्रियाताई सुळे यांच्या खांद्या समर्थक म्हणून परिचित असणाऱ्या छायाताई या शरद पवार साहेब व सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत राहिल्या व त्यांच्या याच एकनिष्ठतेचे फळ म्हणून त्या पुन्हा तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
मिळालेल्या संधीचे सोने करणे हा त्यांचा स्वभाव या पदाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेक दुभंगलेली संसार उभे करण्याचे काम केले आहे. पोलीस स्टेशन, तहसील कचेरी, उपजिल्हा रुग्णालय, विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात त्यां नेहमी जनतेचे प्रश्न घेऊन स्वतः पायपीट करून प्रसंगी अधिकाऱ्यांना धारेवर धरून न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात.
कितीही कठीण प्रसंग असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य नेहमी कायम असते. याचमुळे महिला वर्गांचा अफाट प्रतिसाद व आसणारा दांडगा संपर्क यामुळे भविष्यात त्यांना नक्कीच याहीपेक्षा मोठे पद मिळणार हे तितकेच खरे आहे.
छायाताईंच्या कुटुंबात कसलीही राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी नसताना त्या राष्ट्रवादी सारख्या प्रमुख पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष म्हणून कित्येक वर्ष कार्यरत आहेत यातच त्यांच्या कार्याची ओळख होते.
छायाताई या रणरागिनेला स्वराज्य न्युज तर्फे वाढदिवसानिमित्त उदंड व निरोगी आयुष्याच्या लाख लाख
शुभेच्छा.
