इंदापूर तालुक्यातील निमसाखर नजीक बर्गे वस्ती येथे श्रीदत्त अनघादेवी मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी हळदीकुंकवासाठी व विडे घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली.

श्रीदत्त अनघादेवीचे मुळ मंदिर आंध्र प्रदेश मध्ये आहे त्यानंतर दुसरे मंदिर महाराष्ट्रात इंदापूर तालुक्यातील निमसाखर याच गावात आहे. हे मंदिर नीरा नदीपासून दोन किलोमीटर अंतरावर निमसाखरच्या बर्गे वस्ती येथे आहे.

      गेले तीन वर्षापासून या मंदिरात महिला प्रचंड प्रमाणात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व ओवसण्यासाठी व विडे लुटण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. सालाबादाप्रमाणे याही वर्षी महिलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा असणारा मकर संक्रातीच्या सणानिमित्त या मंदिरात महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.. प्रथम पाच महिलांनी या देवीची पूजा केली होती व ओटी भरण्यात आली. सौ चतूरा साळुंके कवीता साळूंके. कांता हुंबे पदमिनी डूबल . लता बर्गे सुचता बर्गे. सुजता बर्गे ईत्यादी महीलांनी पूजा केली. यावर्षी हळदी कुंकाचे करंड लूटण्यासाठी ठेवण्यात आले होते .

 

या कार्यक्रमाचे आयोजन पायल जाधव यानी केले.

तसेच हळदी कूंकवाचे करंडाचे नियोजन डाॅ अनिता बिरांगने . रा सोलापुर यांने केले. संगीता भट्ट यांनी सहकार्य केले.

या सर्व कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *