दिनांक ११ फेब्रुवारी

इंदापूर : भाजपाच्या गाव चलो अभियानांतर्गत माजी मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आज (दि१०) दिवसभर बोरी गावातील परिसरात अनेक शेतकरी, व्यवसायिक, कष्टकरी, शेतमजूर, कारागीर, युवक, यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून भाजपा पक्षाविषयी व पंतप्रधान मोदी यांच्या विषयी काय वाटते हे जाणून घेत भाजपाने
राबविलेले विविध घटकासाठी योजनांची माहिती देत होते. ही माहिती देत असताना पक्षाविषयी जनसामान्यांमध्ये काय भावना आहेत याचाही कानोसा घेत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या गाव चलो अभियानांतर्गत ज्या गावांमध्ये विधानसभेला आपण पिछाडीवर होतो त्याच गावात जाऊन समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष भेटून अडीअडचणी समजून घेण्यासाठी हा अभियानाचा मुख्य हेतू आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मला असे जाणवले की या येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडणार असे ठणकावून सांगितले.अभियानाला लोकांचा उदंड प्रतिसाद आहे.यावेळी अनेकांनी अडचणी बरोबरच झालेल्या विकास कामाविषयी तक्रारी देखील केल्या.
ग्रामदैवत खंडोबाची आरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
पत्रकारांनी विधानसभा व लोकसभा यावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मी आता अनुभवातून शिकलोय असे मिश्किलपणे उत्तर दिल्याने येणाऱ्या निवडणुका अटीतटीच्या होणार हे नक्की.
हर्षवर्धन पाटील यांचा आजचा मुक्काम बोरी गा
वातच आहे.
