- दिनांक १८ फेब्रुवारी

इंदापुर : (दि १७) काल इंदापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व कोअर कमिटी इंदापुर तालुका अध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी येणाऱ्या २०२४ ची विधानसभा निवडणुक हर्षवर्धन पाटील लढविणारच असे पत्रकार परिषदेत जाहिर केले.
ते म्हणाले की २००९,२०१४,व २०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तत्कालीन परिस्थितीत बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापुर मतदारसंघातून मताधिक्य दिले पण विधानसभेला आमच्या विरोधातील उमेदवाराला साथ दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.आता पुन्हा आम्ही फसणार नाही,आता विधानसभेला आमच्या उमेदवारी ला पाठिंबा असेल तरच आम्ही लोकसभेला तुमचा विचार करु असे अजित पवार यांना अप्रत्यक्ष ठणकाविले. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या समोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुक चुरशीची होत असतानाच पत्रकार परिषद घेऊन दोघा बहिण भावांनी कसल्याही परिस्थितीत इंदापुर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविणार असे जाहिर केलेने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनाही कोंडीत पकडले आहे.
सध्या विद्यमान परिस्थितीत राज्यात भाजपा,शिवसेना (शिंदे), व राष्ट्रवादी (अजित पवार) सत्तेत असल्याने पुन्हा एकदा आघाडी धर्माचे पालन होणार कि पाठिमागीलच पुनरावृत्ती होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.अशा परिस्थितीत भाजपा कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.इंदापुर विधानसभा मतदारसंघांची जागा राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोट्यातील आहे या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.एक मात्र नक्की आहे यावेळी हर्षवर्धन पाटील यांना डावलणे राष्ट्रवादी काँग्रेस ला महागात पडणार आहे.
