दि.२० फेब्रुवारी

इंदापूर : शहरात सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने शिवजयंतीचा सोहळा संपन्न होत असताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर मध्ये माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे मित्रपरिवाराच्या वतीने शिवजयंती सोहळा संपन्न झाला. दादासाहेब सोनवणे हे चळवळीतील कार्यकर्ता म्हणून शहरात व तालुक्यात ख्यातनाम आहेत. महापुरुषांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती सोहळ्याचे आयोजन करतात.

आज (दि१९) फेब्रुवारी रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर मध्ये शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व शिवाजी महाराजांविषयी जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यानासह जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून शिवजयंती कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मा.नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे,आर.पी.आय.तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे,आर.पी.आय.जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे, गटनेते गजानन गवळी,प्रा.अशोक मखरे (सर )नगरसेवक अनिकेत वाघ,नगरसेवक अमर गाडे,नगरसेवक सुधीर मखरे,बारामती आर. टी.ओ. आँफिसर तेजस मखरे,मा.नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर कार्याध्यक्ष मा.दादासाहेब सोनवणे,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अहमदरजा सय्यद, इंदापूर शहर उपाध्यक्ष महादेव लोखंडे,चंदु सोनवणे,बाळु आडसुळ,राजाभाऊ सागर,सामाजिक न्याय विभाग इंदापूर शहर अध्यक्ष आनंद (गोट्या) मखरे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष मयुर ढावरे,सामाजिक न्याय विभाग तालुका कार्याध्यक्ष शुभम मखरे,सोनु ढावरे,बाळु मखरे (सर) सुधाकर ढगे (मामा) विध्यार्थी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शिवम शेवाळे,मोहन शिंदे,विशाल ढावरे,बंडू साठे,विलास सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे,शिवम आरडे,ऋषी ढावरे व सर्व समाज बांधव उपस्थित होता.ह्या कार्यक्रमासाठी अजय भैय्या सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *