दिनांक २० फेब्रुवारी

इंदापूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा व चित्रकला परीक्षेमध्ये चांगले यश मिळवले. एन एम एम एस परीक्षेसाठी इयत्ता आठवीचे २३ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख वर्षा नागणे, वैशाली बेंडसुरे, बाबासाहेब साळुंके सुनील मोहिते,नितीन मदने यांनी मार्गदर्शन केले. चित्रकला परीक्षेमध्ये 59 विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षा दिली. त्यापैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन विद्यार्थ्यांना बी श्रेणी मिळाली. इंटरमिजिएट परीक्षेमध्ये 48 विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रकाश पापत यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस,डॉ.श्रेणिक शहा, डॉ.लहू कदम, कैलास कदम, राजश्री मखरे,पर्यवेक्षिका पुष्पा काळे,पालक शिक्षक संघ ,माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *