दिनांक १७ फेब्रुवारी

इंदापूर ; (दि१७) आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमसाखर तालुका इंदापूर येथे पालक व ग्रामस्थ यांच्यासहभातून आनंदी बाजार उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे व्यावसायिक ज्ञान त्यांना मिळावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाजपाला कळेल स्टेशनरी खाऊ व सर्व प्रकारचे स्टॉल लावले होत
ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात या आनंदी बाजाराच्या उपक्रमात सहभागी झाले. विविध वस्तू खरेदी करून या आनंदी बाजाराचा आनंद द्विगुणित केला.
या कार्यक्रमाचे उद्घघाटन निमसाखर गावच्या उपसरपंच सौ.विद्याताई रणवरे, सौ.जयश्रीताई अडसूळ ,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पं .स.सदस्य गोंविदराव रणवरे, केंद्रप्रमुख श्री हगारे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दत्तात्रय घोडे सर व त्यांचे सर्व सहकारी, ग्रामसेवक श्री.भिलारे साहेब, श्री. विशाल रणवरे व परिसरातील सर्व पालक, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच, जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे व्यवसायिक ज्ञान त्यांना मिळावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे,स्टेशनरी, खाऊ,व सर्व प्रकारचे स्टाॅल लावले होते. गावातील लोक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी उपस्थित होते. सर्वांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून विद्यार्थ्यांबरोबर बाजाराचा आनंद लुटला.
