दिनांक १० मार्च

 

इंदापूर : महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इंदापूर शहरात नामांकित मगर एक्सीडेंट व डोळ्याच्या हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून सकाळी १०.३० वाजता मधुमेह व रक्तदाब रुग्णांसाठी डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते .अशी माहिती डॉक्टर समीर मगर यांनी दिली.

शिबीराचे उद्घाटन डॉक्टर जयश्री गटकुळ , महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, महिला पोलीस कल्याणी खंडागळे यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले.

या कॅम्प साठी अरविंद नेत्रालय मुंबई येथील अनुभवी दृष्टीपटल (रेटिना) तज्ञ डॉक्टर पूजा वाबळे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत दृष्टीपटल तपासणी व शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर राम अरणकर, डॉक्टर पूजा वाबळे, डॉक्टर अपर्णा काटे, जयश्री खबाले, रतन पाटोळे, निर्मला जाधव, उज्वला गायकवाड यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.

यावेळी अनुराधा गारटकर,उमा इंगोले,हेमा माळुंजकर, सुनीता वाघ,रेखा जोशी, रहेना शेख, शारदा नागपुरे, कांचन बानकर ,कल्पना भोर,अर्चना शिंदे, सुनंदा अरगडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आरिद्धी मगर, डॉक्टर गीता मगर यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर समीर मगर यांनी आभार

मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *