- दि. १२ नोव्हेंबर

भिमानगर : आज (दि.१२) रोजी भिमानगर(चौक) तालुका माढा येथे पुणे सोलापूर हायवे लगत भोईटे अमृततुल्य व पांडुरंग वडेवाले यांच्या द्वितीय शाखेचा प्रारंभ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व प्रदिपदादा गारटकर, व अरविंद (तात्य) वाघ (मा. उपनगराध्यक्ष इं. न. पा.), व संजयदादा पाटिल(मा. कृषी सभापती सोलापूर जि.प.) यांच्या परम
या द्वितीय शाखा लखन आरडे व दिगांबर आरडे या दोन बंधूंनी चालू केली असून भिमानगर, रांजणी, उजनी परिसरातील ग्राहक राजाला इंदापूर किंवा टेंभुर्णी या ठिकाणी हॉटेलमधील चविष्ट पदार्थ मिळतात तेच पदार्थ आजपासून आपल्या भिमानगर येथे उपलब्ध होत आहेत, व ग्राहकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे याच आनंद होत आहे असे आरडे बंधूनी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे.व्यावसायिक छोटा असो की मोठा मनापासून करता आला पाहिजे. कोणताही व्यवसाय मनापासून केल्याने निश्चितच फायदा होतो. आपणही या व्यवसायात यशस्वी व्हाल व आपल्या या द्वितीय शाखेबरोबरच संपूर्ण पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या शाखेचा विस्तार व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी संजय (दादा) पाटील (माजी कृषी सभापती सोलापूर जिल्हा परिषद) म्हणाले की भोईटे अमृततुल्य व पांडुरंग वडेवाले यांच्या द्वितीय शाखेचा प्रारंभ आमच्या सोलापूर जिल्ह्यात व आमच्या भिमानगर येथे होत आहे याचा मनापासून आनंद होत आहे. आपण या व्यवसायात प्रगती कराल व आमच्या परिसरातील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा द्याल हीच अपेक्षा यासाठी आमचेही सहकार्य वेळोवेळी राहील.
यावेळी भोईटे अमृततुल्य फ्रेंचाईझी अविनाश भोईटे म्हणाले की आमची प्रथम शाखा इंदापूर तहसील कचेरी लगत असून द्वितीय शाखा गलांडवाडी येथे कार्यरत आहे व आज तृतीय शाखा भिमानगर येथे होत असून भविष्यात देखील आमच्या शाखेचा विस्तार करणार आहोत.
पांडुरंग वडेवाले चे फ्रेंचाईझी पांडुरंग जाधव व विकास पवार म्हणाले की आमची प्रथम शाखा पुणे सोलापूर बायपास रोड इंदापूर येथे कार्यरत असून अल्पावधीतच आमच्या उत्कृष्ट वडापावच्या मागणीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बघून आज आम्ही लखन आरडे व दिगंबर आरडे यांच्या माध्यमातून भिमानगर येथे द्वितीय शाखेचा प्रारंभ करीत आहोत येणाऱ्या काही दिवसातच टेंभुर्णी येथे आमच्या तृतीय शाखेचा प्रारंभ करणार आहोत.
यावेळी उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रदीपदादा गारटकर होते हा कार्यक्रम पुढील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
अरविंद(तात्या) वाघ (माजी उपनगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका),संजय (दादा) पाटील (माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सोलापूर),वेताळ (अण्णा) जाधव (संचालक विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना),रमेश (दादा) देवकर (सरपंच ग्रामपंचायत हिंगणगाव ),संजय देवकर (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर),पै. गणेश पाटील (युवा नेते सोलापूर जिल्हा),बिभिषन देवकर (युवा नेते पुणे जिल्हा), नतीन आरडे (संस्थापक अध्यक्ष शिवशाही शेतकरी संघटना), संतोष (भाऊ) आरडे (पुणे जिल्हाध्यक्ष आधुनिक लहुजी सेना), गणेश (भाऊ) शिंगाडे (उपसरपंच ग्रामपंचायत हिंगणगाव),आतुल जानकर, सागर शिंगाडे, प्रितेश जाधव, अविनाश जाधव, प्रशांत उतेकर,सुरज सलगर, इत्यादी उपस्थित होते.
