दिनांक १९ फेब्रुवारी

इंदापुर : (दि १९) तालुक्यातील हिंगणगाव येथे स्थानिक निधी  २०२३ – २०२४  अंतर्गत दहा लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच सौ रसिका दिगंबर आरडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी उपसरपंच सिद्धेश्वर खराडे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी आरडे, धनंजय खराडे, सुधीर खराडे,शांताराम माने, धनंजय आरडे व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी  सरपंच सौ रसिका आरडे म्हणाल्या की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी स्वतः व सर्व ग्रामपंचायत सदस्य एक विचाराने आहोत. गावाच्या विकासाच्या बाबतीत कसलेही प्रकारचे राजकारण आम्ही करणार नाही व इतरांनी देखील करू नये,शेवटी ज्या गावात आपण राहतो त्या गावाचा विकास आपल्या कार्यकाळात व्हावा हीच प्रत्येक सदस्यांनी लक्षात ठेवावे. आपण सर्वजण गावाचे देणे लागतो या भावनेतून आपले काम असायला पाहिजे. शेवटी ते असेही म्हणाले की स्थानिक निधी अंतर्गत आज शुभारंभ करण्यात आलेल्या कामाचा दर्जा आराखडा प्रमाणे व्हावा. दर्जेदार काम झाल्यास आम्हा सर्वांचे संबंधित ठेकेदारास सहकार्य राहील..

यावेळी उपसरपंच सिद्धेश्वर खराडे म्हणाले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गटातटाचा विचार न करता आमदार दत्तात्रय भरणे यांनी आम्ही सुचवलेल्या कामास प्राधान्य दिले व आणखीही भविष्यात पाहिजे तो विकास निधी देण्यास तयार असल्याचे आवर्जून सांगितले. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्याचे कामासाठी आणखी निधी उपलब्ध होणार आहे असे सांगितले. शेवटी त्यांनी ग्रामस्थांसमोर आपल्या मनोगतामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचे  आभार मानले.

यावेळी उपसरपंच सिद्धेश्वर खराडे , ग्रामपंचायत सदस्य जान्हवी आरडे,, धनंजय खराडे, सुधीर खराडे हरिदास माने, शांताराम माने, अशोक जामदार, धनंजय आरडे, रणजीत देवकर, धनंजय माने,अतुल माने, किशोर कांबळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *