टेंभूर्णी / दि. २९ नोव्हेंबर

मोडनिंब ता माढा येथील युवक रोहित धोत्रे खून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाया पोलिस कर्मचारी शिवाजी भोसले आत्तार व सरडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच बेकायदेशीर काम करण्याऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्या-या पोलिस उपअधिक्षक विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी अखील महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे वतीने टेंभूर्णी पोलिस स्टेशन समोर जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे यांचे नेतृत्वात मंगळवार दि.28 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की रोहित धोत्रे वय 17 रा.मोडनिंब यास येथील लोकांनी डुकराचे पिल्लू देत नाही म्हणून दि.17/10/200 रोजी टॉमी,स्टीकने मारहाण केली होती यामध्ये डोक्यास मार लागल्याने त्यास मोडनिंब येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. व मयत रोहितचे अंध वडील कुटुंबासह मोडनिंब पोलिस ठाण्यात गेले असता तेथील हवालदार शिवाजी भोसले व आसीफ आतार यांनी तक्रार न घेता टेंभूर्णी पोलिस स्टेशनला पाठवले. टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये ही त्यांची दखल घेतली नाही दरम्यान जखमी युवक सीरीयस झाल्याने त्यास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यानंतर चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.परंतु यावेळी पोलीसांनी दखल का घेतली नाही तसेच त्यांचा मृत्यू पूर्व जबाब घेतला नाही यावरून वरील पोलीस कर्मचारी व त्यांची पाठराखण करणारे पोलिस अधिकारी पोलिस उपअधिक्षक डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.या मागणी साठी अखील महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे वतीने जिल्हाध्यक्ष यांचे
राजकुमार धोत्रे नेतृत्वात टेंभूर्णी पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून यामध्ये सुनिल पाथरूड, लक्ष्मी धोत्रे रंजना नलवडे, सावित्रीबाई धोत्रे,शिवराम पवार, सचिन पवार, राहुल धोत्रे सुरज धोत्रे अभिषेक धोत्रे शंभू पवार,सोनबा धोत्रे दिलीप पवार,आदि समाजबांधव आणि मृत रोहितचे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना

बेमुदत धरणे आंदोलन

आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे                  आंदोलकाच्या या आहेत मागण्या

•राहुल धोत्रेण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाया पोलिस कर्मचारी शिवाजी भोसले आत्तार व सरडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,

> बेकायदेशीर काम करण्याऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्याया पोलिस उपअधिक्षक विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

> टेंभुर्णी भागात कायदा व सुविधा शिल्लक राहिला नसून पोलिस अधिक्षक यांनी लक्ष घालावे व कायदेशीर कारवाई करावी.

> राहुल धोत्रे खूण प्रकरण संदर्भात लेखी पत्र देवून त्याची अमलबजावणी न करता वहार समाजाची घोर फसवणूक करण्याया पोलिस उपअधक्षिक विशाल हिरे यांचा जाहिर निषेध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *